Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मास्क

March 16, 2013

Search by Tags:  कथा


खरे तर मुलीना बंधनात ठेवणारा हा समाज किती कुत्सित वृतीचा असतो- याच समाजात मुक्तपणे व्यवहार करताना मुलीना किती संकटाना तोंड द्यावे लागते हे फक्त मुलीच सांगू शकतात- पुरुष म्हणून मला त्याचे काही कौतुक नव्हते- कारण मी त्या सर्व घटनांचा अनुभव कधीच घेतला नव्हता- मी जर मुलगी असतो तर नक्कीच या सर्व प्रश्नांवर प्रखर भाषण देऊ शकलो असतो- पण खरच मुलीना या समाजात फिरताना संकटाना तोंड द्यावे लागते का याचा शोध घेण्यासाठी मी घराबाहेर पडलो- सतत ३ महिने सर्व प्रकारच्या मुली आणि महिलांचे निरीक्षण सुरु केले- तसा निरीक्षण करणारा मी पुरुष असल्यामुळे मलाच त्या संशोधनात संकटाना सामोरे जावे लागले- चित्रपटगृह, उपहारगृह, बस व रेल्वे स्टेशन, भाजी बाजार, मार्केट, शोप्पिंग मॉल, या आणि अन्य सर्वच ठिकाणी मला महिलांच्या विविध रूपांचे दर्शन झाले- कधी कालिका, चंडिका, लक्ष्मी, सरस्वती, शारदा, अंबिका नको त्या मातांचे दैवी आणि प्रसंगी दानवी रूप जवळून पहावयास मिळाले- तेव्हा मला या समाजाची कीव आली- ज्या समाजात आपण राहतो वावरतो स्वातंत्र्याचा उपभोग घेतो- त्याच समाजात आपण संस्कार संस्कृतीची व्याख्याने देतो- महिलांना मुक्तपणे संचार करू देतो- त्याच समाजात महिलांवर अत्याचार होतात- तेव्हा दोषी कोण? हा प्रश्न निर्माण होतो-

आपण मुंबईत राहणारे असाल तर महिला आणि मुलींबद्दल जास्त सांगणे नको- सिटी बस किवा लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना मुलीना नको ते आणि नको त्या जागी अनोळखी स्पर्श सारखे होत असतात- कधी तारुण्याचा नवा कोरा स्पर्श, कधी पन्नाशीतल्या चीरतरुणाचा नकोसा वाटणारा स्पर्श, कधी तोंडात बत्तीशी नसलेल्या वृद्ध तरुणाचा स्पर्श, असह्य वाटणारे असंख्य स्पर्श सहन करत आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या वाटेवर सतत धावत राहते ती स्त्री असते- पण कधी कधी स्त्रीलंपट तरुणाला कानशिलात वाजवणारी मुलगी पुढे सरसावते कारण असते रोज सहन केलेल्या सहनशीलतेचा विस्फोट- काही वयोवृधाना प्रचंड शिव्यांचा पाढाच ऐकावा लागतो- निर्लज्य त्या म्हातार्याला अपमान वाटतो- आपण चुकून धक्का लावल्याचा खोटा आव आणत लोकांची केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो- परमेश्वराने स्त्रियांना स्पर्श ज्ञानाचे वरदान दिलेले आहे हेच आपण विसरतो. प्रत्येक स्पर्शात असलेल्या चांगल्या आणी वाईट भावनेचा गंध तिला सहज ओळख्कता येतो- या सर्व स्पर्शातून कशीबशी वाचून कोपर्यात उभी असलेली तरुणी वाट पाहत असते बस किवा ट्रेन ची तेव्हा तिला सुरक्षित वाटत असले तरी असंख्य नजरेने होणारे बलात्कार त्यांना सहन करावेच लागतात- चुकून नजर पुरुषाकडे गेली तर त्याला आपण मिठीतच घेतल्यासारखे वाटते- आणि तो अजून आसुसलेल्या नजरेने पाहू लागतो जणू तिचे सोंदर्य निरखून पाहण्याचा हक्कच त्याला कोर्टाने दिलेला असावा- वयाचा तर्क लावण्याची गरज आपल्याला नाहीच- कारण मिशी न फुटलेल्या नवतरुणापासून ते बापाच्या, आजोबांच्या वयाचे वीर पुरुषही आपल्या नजरेची वासना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही- आपल्या जवळून जाणाऱ्या स्त्रियांकडे चेहर्यापेक्षा अधिक तिच्या अंग प्रत्यांगाकडे निरखून पहिले जाते-आपली नजरानजर झालीच तर किंचित बाजूला झालेली नजर पुन्हा नवीन पाखरू शोधू लागते- हे सर्व अत्याचार सहन करत खाली मान घालून पुढचा प्रवास ती तरुणी करत असते-

मी पाहिलंय रिक्षा पुसताना नजरेत तरुणीला सामावणारा चालक, मी पाहिलंय बस चालवताना काचेतून मागे उभी असलेली तरुणीशी नजर मिळवताना चालक, मी पाहिलंय भाजी घेताना गप्पांमध्ये गुंग असलेल्या स्त्रीकडे निरखून पाहणारा भाजीवाला, मी पाहिलंय हायवेवर रस्त्याच्या कडेला उभे असलेले जोडपे असते पण त्यात केवळ स्त्रीला हेरणारा मालट्रकचा ड्रैव्हर. सायकलचा पंक्चर काढताना वाकून पाहणाऱ्या तरुणीच लक्ष नसत कुठे हेच नेमके हेरले असते त्याने. बायकोसोबत चालताना दुसऱ्या स्त्रीकडे नजर देणारे असंख्य पुरुष मी पाहिलेत, क्लासमध्ये चिकणी एकच आहे असे म्हणणारे क्षिक्षक हि मी पाहिलेयेत, ऑफिस मध्ये आयटम भारी आले आहेत असही मी पाहिलंय, रस्त्याचा कडेला दरिद्री भिकारीण भिक मागत असते फाटलेले पोलके त्र्यातून अंग दिसत असते लक्ष भिक देताना सहज जाते असे लोक हि मी पाहिलेयेत, नजरेला दिसेल ते पाहावे आणि नयनसुख घ्यावे असे बोलणारे हि मी पाहिलेयेत, हे सर्व आपणही कधीतरी अनुभवल असेल- हि सामाजिक वृत्ती आहे कि व्यभिचार हाच प्रश्न आहे- या सर्व घटना प्रत्यक्ष होत असतानाही आपण हतबल असतो कारण आपण हि या मर्माचे प्रवाशी असतो-
Search by Tags:  कथा
Top

Sachin Jadhav's Blog

Blog Stats
  • 5409 hits